राजकीय

सुनंदा भिलारे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी किकवी सोसायटीतून बहुमताने निवड


सुनंदा भिलारे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी किकवी सोसायटीतून बहुमताने निवड

राजगड तोरणा एक्स्प्रेस न्यूज : प्रतिनिधी भोर / किकवी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर किकवी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या विशेष सभेत बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी म्हणून श्री. संस्थेचे चेयरमन अशोक मोरे यांनी आवाजी मतदान घेऊन किकवी गावच्या माजी सरपंच सुनंदा नवनाथ भिलारे यांची 13 पैकी 9 मतदान मिळाल्याने सुनंदा भिलारे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
सोसायटीच्या सभासदांची विशेष बैठक आज घेण्यात आली. या बैठकीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदानाचा अधिकार योग्य पद्धतीने वापरण्यासाठी सभासदांनी आपला प्रतिनिधी निवडण्याबाबत चर्चा केली. यावेळी उपस्थित सभासदांनी. किकवी गावचे माजी सरपंच व किकवी सहकार सोसायटीचे चेयरमन नवनाथ भिलारे यांच्या सुविध्य पत्नी सुनंदा नवनाथ भिलारे यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली.
सभेमध्ये झालेल्या आवाजी मतदानात श्री. सुनंदा भिलारे यांना बहुमत मिळाल्याने त्यांची मतदानासाठी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सभासदांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित प्रतिनिधी श्री. सुनंदा भिलारे यांनी, सोसायटीच्या सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी तसेच शेतकरी, सभासद आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या हितासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सहकारी संस्थांमध्ये राजकीय तसेच सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे. विविध सोसायट्यांमधील प्रतिनिधींच्या निवडीकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले असून, प्रत्येक सोसायटीतील सभासदांचा कौल महत्त्वाचा मानला जात आहे.
या बैठकीस सोसायटीचे माजी चेयरमन गोपाळ कोंढाळकर . माजी चेयरमन नवनाथ भिलारे . माजी चेयरमन अर्जुन अहिरे. बाळासाहेब मोरे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सचिव मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेचा निर्णय बहुमताने झाल्याने आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या दृष्टीने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सभासदांचा विश्वास निर्णायक
सोसायटीच्या सभासदांनी बहुमताने दिलेला कौल हा संबंधित प्रतिनिधीवरील विश्वासाचे प्रतीक असल्याची भावना यावेळी नवनाथ भिलारे यांनी व्यक्त करण्यात आली. आगामी काळात सहकार क्षेत्रातील निवडणुकीत हा कौल कोणाच्या पारड्यात जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *