राजकीय

भाजप चा उमेदवार एक मुठीने निवडून द्या के डी सोनवणे. कामथडी भोंगवली गटात महादेव सोनवणे याना मतदारांचा प्रतिसाद


 

भाजप चा उमेदवार एक मुठीने निवडून द्या के डी सोनवणे.

कामथडी भोंगवली गटात महादेव सोनवणे याना मतदारांचा प्रतिसाद

राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर

भोर तालुक्यातील कामथडी भोंगवली जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी मागत असलेले के डी सोनवणे यांचे चिरंजीव महादेव सोनवणे यांना मतदारांचा प्रतिसाद भेटत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आज कापूरहोळ येथील खडी क्रेशर वरील मैदानात जेष्ठ नेते के डी सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कामथडी व भोंगवली गटातील मतदार नागरिकांनी खच्च गर्दी करून महादेव सोनवणे यांना पाठिंबा असल्याचे दाखवून दिले आहे.

कामथडी . भोंगवली गटातील मतदार नागरिकांनी महादेव सोनावणे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळावी म्हणून मत व्यक्त करताना
माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे नेते संग्राम थोपटें यांना विनंती केली आहे .

या वेळी के डी भाऊ सोनवणे बोलताना भाऊक होऊन म्हणाले की विरोधकांनी माझ्या वर्ती बोलताना नीट विचार करून बोला मी आजोबांच्या वयाचा आहे मला ब्लॅक लिस्ट ला टाकायची धमकी देऊ नका मी कुणाच्या बापाला घाबरत नाही मी . थोपटें साहिबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेला कार्यकर्ता आहे.
या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती उपसभापती रोहन बाठे. माजी पुणे जिल्हा अध्यक्ष महेश टापरे . विश्वास ननावरे. महेश धाडवे. शिव प्रहार संघटना अध्यक्ष संतोष मोहिते. आदी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *