तायक्वांदो स्पर्धेत किकवी विद्यालयाला घवघवीत यश
तायक्वांदो स्पर्धेत किकवी विद्यालयाला घवघवीत यश
राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर / किकवी
नवसह्याद्री संकुल नसरापूर येथे घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी येथील सहा विध्यार्थ्यांचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला असून तायक्वांदो स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी विद्यालयाला घवघवीत यश मिळाले आहे. ज्ञानेश्वरी संजय बाठे कार्तिकी सोमनाथ पांगारे शंभू दत्तात्रय चोधरी संस्कृती रवींद्र गाडे प्रांजल महेंद्र ओंबळे
तन्वी तनपुरे. या विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली असून स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, शिस्त, संयम आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविले. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत जिद्दीने खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना चांगली लढत दिली.
तायक्वांदो हा केवळ खेळ नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षण, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक ताकद, एकाग्रता आणि शिस्त निर्माण करणारा क्रीडा प्रकार आहे. विद्यार्थ्यांनी नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल
किकवी विद्यालयाचे शिक्षक मार्गदर्शक श्री बोबडे सर. मुख्याध्यापक श्री राऊत सर.किकवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय भिलारे तायक्वांदो प्रशिक्षक श्री भगत सर शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा संस्थेचे चेयरमन श्री दत्तात्र भिलारे यांनी व्यक्त केली.





