गणेशोत्सवानिमित्त जय महाराष्ट्र मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर
गणेशोत्सवानिमित्त जय महाराष्ट्र मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर
राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर / वेळू
भोर तालुक्यातील वेळू येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ वेळू फाटा सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ आयोजित आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल वेळू यांच्या सहकार्याने दि १६/०९/२०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात एकूण ७४
जणांनी रक्तदान केले
या शिबिराचे उद्घाटन भोर तालुका पंचायत समितीचे उपसभापती मा विशाल कोंडे, वेळू ग्रामपंचायत माजी उपसरपंच मा पांडुरंग पांगारे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यावेळी प्रत्येक रक्तदात्यास सर्टिफिकेट तसेच एक बॅग भेट देण्यात आली
जय महाराष्ट्र मित्र मंडळ वेळू फाटा यांचे रक्तदान शिबीराचे हे दुसरे वर्ष असून याला पंचक्रोशीतील नागरिकांचे खुप उत्साहात सहकार्य व प्रतिसाद मिळत आहे .
हे रक्तदान शिबिर मंडळाचे सदस्य स्वर्गीय दीपक पांगारे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येत आहे.
या शिबिराचे आयोजन करण्यात सिद्धिविनायक हॉस्पीटलचे डॉ राजेंद्र डिंबळे यांनी खूप मोलाचे सहकार्य केले . गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी जपत जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक, युवक तसेच गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक उपक्रमांचा उत्सव व्हावा, या उद्देशाने मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिरामध्ये रक्तदात्यांची प्राथमिक तपासणी करून पात्र रक्तदात्यांकडून रक्त संकलित करण्यात आले.
रक्तदान हे अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीदरम्यान रक्ताची आवश्यकता असलेले रुग्ण तसेच विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे आभार मानून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
“गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असून, रक्तदानासारख्या उपक्रमातून गरजू रुग्णांना मदत होऊ शकते. भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम रा डॉल्बी डीजे न वाजवता पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन मिरवणूक काढणार असा पक्का निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या रक्तदान शिबिरामुळे गणेशोत्सवाला सामाजिक सेवेची जोड मिळाली असून, ‘उत्सवातून सेवा’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.





