शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जय श्रीराम राईस मिलचा पुढाकार; भात वाहतूक मोफत, योग्य दरात खरेदीची हमी!
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जय श्रीराम राईस मिलचा पुढाकार; भात वाहतूक मोफत, योग्य दरात खरेदीची हमी!
२३ वर्षांच्या अनुभवातून शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा; लहू नाना शेलार यांचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
राजगड तोरणा एक्स्प्रेस : राजगड /भोर :
राजगड तालुक्यातील करंजावने वांगणी फाटा येथे भोर पंचायत समिती चे माजी सभापती लहू नाना शेलार यांनी शेतकऱ्यांना शेती व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना, विशेषतः दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या कष्टाच्या भाताला योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने जय श्रीराम राईस मिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जय श्रीराम राईस मिलचे मालक तथा भोर तालुका पंचायत समितीचे सभापती लहू नाना शेलार यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत मोफत भात वाहतुकीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
जय श्रीराम राईस मिलला तब्बल २३ वर्षांचा दांडगा अनुभव असून, या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर मिलने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या तांदळाला आवश्यकतेप्रमाणे पॉलिश करून देण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार तांदळाची प्रक्रिया करून घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, तांदूळ तसेच तांदळाच्या कणीमध्ये माती किंवा खडे येणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जात असून, स्वच्छ आणि दर्जेदार तांदूळ उपलब्ध करून देण्याची हमी मिलच्या वतीने देण्यात आली आहे. तांदळाची गुणवत्ता आणि स्वच्छता यांना प्राधान्य देत आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करण्यावर भर दिला जात आहे.
सध्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट आणि वाहतुकीचा वाढता खर्च लक्षात घेऊन जय श्रीराम राईस मिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत भात वाहतुकीची सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांकडून भाताची योग्य भावात खरेदी करण्याची हमीही लहू नाना शेलार यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या भाताला योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी आणि त्यांना प्रक्रिया करण्यासाठी विश्वासार्ह ठिकाण उपलब्ध व्हावे, या भावनेतून जय श्रीराम राईस मिलच्या माध्यमातून या सुविधा देण्यात येत आहेत.
२३ वर्षांचा अनुभव, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तांदळाचे पॉलिशिंग, स्वच्छ व दर्जेदार तांदळाची खात्री, मोफत भात वाहतूक आणि योग्य भावात भात खरेदी अशा विविध सुविधांमुळे जय श्रीराम राईस मिल शेतकऱ्यांसाठी उपयुक्त केंद्र ठरत आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान आणि त्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत जय श्रीराम राईस मिल सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास लहू नाना शेलार यांनी व्यक्त केला आहे.





