क्राईम

भोर तालुक्यातील घोरेपडल येथील पोलिस पाटलाचा खून


भोर तालुक्यातील घोरेपडल येथील पोलिस पाटलाचा खून
राजगड तोरणा एक्स्प्रेस: भोर

भोर तालुक्यातील घोरेपडळ-सांगवी बुद्रुक येथील पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, अशोक साधू येनपुरे यांचा खून नेमका कोणत्या कारणावरून झाला, त्यांच्यावर कोणत्या कारणाने जीव घेणा हल्ला करण्यात आला आणि या घटनेमागे नेमके कोण आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. खुनामागील कारण शोधणे, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड करणे आणि संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेणे, हे आता राजगड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

दरम्यान, या गंभीर घटनेचा सखोल तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी आणि घटनेमागील सत्य जनतेसमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *