भोर वेल्हा(राजगड) तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नामदार काशिनाथराव खुटवड साहेब यांच्या विचारावर कार्यरत असणारे युवा नेते मा श्री विक्रम दादा खुटवड
भोर वेल्हा(राजगड) तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नामदार काशिनाथराव खुटवड साहेब यांच्या विचारावर कार्यरत असणारे युवा नेते मा श्री विक्रम दादा खुटवड
राजगड तोरणा एक्स्प्रेस : भोर
विचारांचा वारसा आणि विकासाचा ध्यास
वैचारिक वारसा आणि सामाजिक बांधिलकी
विक्रम दादांचे व्यक्तिमत्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्यांनी आपल्या कार्याचा पाया मानले आहे. समाजातील शेतकरी कष्टकरी, वंचित घटकांना न्याय मिळवून देणे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे ही त्यांची कार्यपद्धती अविरहित चालू आहे आहे.
प्रशासकीय अनुभव आणि पदे
त्यांच्याकडे प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असून त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेतच पण मध्यंतरीच्या काळात त्यांच्याकडे कोणतीही पद नसताना त्यांनी केलेल्या कामाचा आलेख हा उंचावलेलाच पाहण्यास मिळतो आहे :
उपसभापती, भोर तालुका: तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समिती (DPDC): जिल्ह्याच्या विकास आराखड्यात आपल्या भागाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे कसब त्यांच्याकडे आहे त्यातून कोट्यवधीची निधी त्यांनी या मार्फत या विभागात आणले आहेत .
अध्यक्ष, गुंजवणी शिक्षण संस्था: शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पिढी घडवण्याचे कार्य ते अविरत करत आहेत असं एक ही गाव नाही तिथं विक्रम दादांच काम नाही सर्वत्र त्यांनी विकासाच्या दृष्टीने लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत.
बहुआयामी व्यक्तिमत्व
विक्रम दादांचे कार्यक्षेत्र केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून त्यांनी इतर क्षेत्रांतही मोलाचे योगदान दिले आहे:
सहकार आणि व्यापार: सहकार क्षेत्रातील बारकावे ओळखून त्यांनी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि व्यापार्यांच्या आणि युवक वर्गाच्या हिताचे हिताचे निर्णय घेतले.
क्रीडा आणि संस्कृती: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नेहमीच क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे.
भोंगवली – कामथडी गणाचे भविष्य
आता पुणे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी भोंगवली – कामथडी या गणातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या भागातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून नागरिक त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.
”राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून, ती समाज परिवर्तनाचे साधन व्हावे,” हा विचार घेऊन विक्रम दादा जनसामान्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.
एक सक्षम, सुशिक्षित आणि अनुभवी लोकप्रतिनिधी म्हणून विक्रम दादा खुटवड यांचा विजय हा भोंगवली – कामथडी गणाच्या सह सर्व तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा विजय ठरेल.





