कुणाला निष्ठेचे फळ तर कुणाला रामाचा वनवास
कुणाला निष्ठेचे फळ तर कुणाला रामाचा वनवास
राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर
येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उद्याचा दिवस हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस ठरला आहे.
उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टीचे ईच्यूक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पण पक्ष कोणाला ए बी फार्म देणार याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्यामुळे कुणाला निष्ठेचे फळ मिळणार तर कुणाला तरी रामाचा वनवास भोगावा लागणार आहे .
उद्या भोर शहरात प्रत्येक मतदार कार्यकर्ता हा आपल्या मानतील उमेदवाराला पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून परकाष्टा करणार आहे .
पण गेली अनेक वर्षांपासून पक्षाशी एक निष्ठ पणे काम करत असलेला धडाडीचा उमेदवार पक्षाने धुडकावले तर काय भूमिका घेणार याच्या कडे पण उभा भोर तालुका लक्ष देऊन पाहणार आहे.
कारण बुधवार दिनांक 21 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे भोर तालुक्यातील राजकीय वर्तुळातील समीकरणे पूर्ण पणे बदललेली दिसणार आहे.
एकाच पक्षातील कदाचित एक मेकांच्या विरोधात निवडणूक लढवतील असे ही चित्र पाहायला मिळू शकते.
म्हणून मंगळवार व बुधवार ह्या दोन दिवसात कुणाला निष्ठेचे फळ तर कुणाला रामाचा वनवास मिळणार हे पाहायला मिळणार आहे.





