राजकीय

विक्रम दादा खुटवड व तृप्ती ताई खुटवड यांची जिल्हा बँकांच्या निवडणुकीत एंट्री


विक्रम दादा खुटवड व तृप्ती ताई खुटवड यांची जिल्हा बँकांच्या निवडणुकीत एंट्री
जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पती-पत्नीची एन्ट्री
सोसायटीतून बिनविरोध प्रतिनिधी म्हणून निवड; सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण

राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर / नसरापूर

विक्रम दादा खुटवड व तृप्ती ताई खुटवड यांनी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून येत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविल्यानंतर आता पती पत्नीची जोडी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आली आहे.
विक्रम दादा खुटवड हे हातवे खुर्द मधील काळेश्वरी विविध कार्यकारी विकास सहकार सोसायटी मधून बनविरोध निवडून आले तर  तृप्ती ताई खुटवड यांची हातवे बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मधून 5 विरुद्ध 7 मतांनी निवडून झाली.
पती-पत्नीची निवड झाल्याने परिसरातील सहकार क्षेत्रात या निवडीची चर्चा रंगली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेने सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून,
त्यानुसार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर संबंधित सोसायटीमध्ये झालेल्या निवडणुकीत विक्रम दादा खुटवड व तृप्ती ताई खुटवड यांची प्रतिनिधी म्हणून  निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे, यापूर्वी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करून निवडून आलेल्या या पती-पत्नीच्या जोडीने आता सहकार क्षेत्रातही आपली भूमिका मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पुणे जिल्ह्यातील विविध सोसायट्यांमध्ये प्रतिनिधी निवडीसाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत.
त्यामुळे सोसायटीचा प्रतिनिधी कोण असणार, याकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
काही भागांत प्रतिनिधी निवडीवरून राजकीय रस्सीखेच सुरू असल्याचेही वृत्त आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि विविध संस्थांशी सातत्याने संपर्कात राहिल्याचा फायदा विक्रम दादा खुटवड व तृप्ती ताई खुटवड यांना झाला असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक पातळीवर केलेले काम, नागरिकांशी असलेला संपर्क आणि सहकार क्षेत्रातील संबंध यामुळे सोसायटीच्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.
या बिनविरोध निवडीमुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या दृष्टीने पती पत्नी यांचे मतदान निर्णयक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्यातील शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध भागांत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
विक्रम दादा खुटवड व तृप्ती ताई खुटवड यांची सोसायटीतून झालेली बिनविरोध निवड ही स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरली असून, आगामी काळात या निवडीचा जिल्हा बँक निवडणुकीतील समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *