रोहन बाठे यांच्या निवासस्थानी गणपती-गौरीचे उत्साहात आगमन
रोहन बाठे यांच्या निवासस्थानी गणपती-गौरीचे उत्साहात आगमन
राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर / कापूरहोळ
भोर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य रोहन दिलीप बाठे यांच्या कापूरहोळ येथील निवासस्थानी गणपती-गौरीचे उत्साहात आगमन झाले असून
पारंपरिक पद्धतीने गणपती. गौरी पूजन सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी रोहन बाठे यांच्या सुविध्य पत्नी प्राची बाठे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात गणपती व गौरीचे विधिवत पूजन करण्यात आले.
गणपतीच्या आगमना वेळी आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांची आरास, विद्युत रोषणाई पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेली सजावट यामुळे घरातील व परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
रोहन बाठे व प्राची बाठे यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत विधिवत पूजा, आरती व नैवेद्य अर्पण करून गौरी मातेचेही पारंपरिक पद्धतीने स्वागत करून पूजन केले.
महिलांनी गौरीसमोर विविध प्रकारच्या नैवेद्यांची तयारी करून धार्मिक परंपरेनुसार कार्यक्रम पार पाडला.
या वेळी कापूरहोळ व परिसरा मधील गावातील नागरिकांनी रोहन बाठे यांच्या निवास्थानी भेट देऊन गणरायाचे व गौरी मातेचे दर्शन घेतले. या वेळी रोहन बाठे यांनी गणरायाकडे परिसरातील नागरिकांचे आरोग्य, सुख-समृद्धी, शेतकऱ्यांना चांगले पीक तसेच सर्वांच्या जीवनात आनंद नांदावा, अशी प्रार्थना केली.





