मासूम संस्था तर्फे धागवंडीत रांगोळी स्पर्धेचे आयोजन
मासूम संस्था तर्फे धागवंडीत रांगोळी स्पर्धेचे आयोजन
राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर / धांगवडी
भोर तालुक्यातील धांगवडी गावातील तनपुरे फॅन्स क्लब गणेश मंडळ सिद्धार्थ नगर,मध्ये महिला उत्कर्ष मंडळ (मासूम संस्था) यांच्या माध्यमातून संविधान जागृती करणाऱ्या फेलो सविता टापरे व करंदी खे.बा गावचे पोलीस पाटील विजय ज्ञानोबा कव्हे यांनी सामजिक संदेश देणाऱ्या मुला मुलींच्या रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या.हि स्पर्धा 13 ते 18 वयोगटातील मुला मुलींसाठी आयोजित केली होती.या वेळी प्रांजल मोरे,अनुज अडसूळ,कृष्णा भिसे,स्वरा जगताप,संध्या जगताप,परिणीती गोलाने, नित्या साळवे,सम्यक गोलाने,अर्णव गोलाने, अन्विका मोरे,अंशिका मोरे,अवनी अडसुळ, तनया पवार या स्पर्धकांनी भाग घेतला होता.या रांगोळी स्पर्धेतून,मोबाईल चा अतिरिक्त वापर टाळावे,पर्यावरण वाचवा,संविधान जागृती, समता व समानता,मुलगी वाचवा या बाबत संदेश मुलांनी दिले आहेत.यावेळी दिव्या शुभम मोरे,दीपाली आगवणे,हर्षराज मोरे,स्वराज गोलाने यांनी परीक्षकांचे काम पाहून.
केलेल्या निरिक्षणातून प्रथम क्रमाक प्रणिती गोलाने,द्वितीय क्रमांक प्रांजल मोरे यांनी तर तृतीय क्रमांक अनुज अडसूळ यांनी मिळवला आहे.
मासूम् संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. भविष्यातही मुला-मुलींच्या कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम राबवणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकारि फेलो सविता टापरे यांनी सांगितले





