सारोळे ते चेलाडी पर्यंत सी एन जी पाईप लाईन च्या कामामुळे सर्व्हिस रस्ता यम राज्याच्या भूमिकेत
सारोळे ते चेलाडी पर्यंत सी एन जी पाईप लाईन च्या कामामुळे सर्व्हिस रस्ता यम राज्याच्या भूमिकेत
राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर / किकवी
पुणे सातारा महामार्गलगत असलेल्या भोर तालुक्यातील सारोळे येथील टोरेंटो कंपनीच्या सी एन जी गॅस पाइपलाइनच्या कामामुळे महामार्गालगतची सर्व्हिस रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
सर्व्हिस रस्त्या पासून दीड मिटर अंतर सोडून सी एन जी गॅस पाईप लाईन चे काम करण्यासाठी परमिश असून .
ही कंपनी व ठेकेदार जणू एन एच आय चे नातेवाईक असल्या सारखे सर्व नियम अटी धाब्यावर बसवत राजरोस पणे सर्व्हिस रस्ता तोडून पाईप लाईन चे काम करत आहेत त्या मुळे सर्व्हिस रस्ता यम राज्याच्या भूमिके असल्याचे नागरिक चर्चा करत आहेत.
रस्ता खराब केल्याने स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच स्थानिक वाहने ये-जा करतात. मात्र पाईप लाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर खड्डे, उखडलेला मुरूम व मातीचे ढिगारे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता अरुंद झाल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडत असून, खोदकाम केलेल्या ठिकाणी चिखल साचणे, पाणी साचणे आणि रस्त्यावर घसरटपणा निर्माण होण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच धुळीमुळे परिसरातील नागरिक आणि दुकानदारांनाही त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र कामानंतर रस्त्याची योग्य पद्धतीने डागडुजी न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
एन एच आय च्या अधिकाऱ्यांनी सर्व्हिस रोडची तातडीने पाहणी करून खराब झालेल्या भागाची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत, रस्त्यावरील माती व मुरूम हटवावा आणि संबंधित कंपनी व ठेकेदारावर कायदेशीर योग्य कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.





