गुलाबी रंगाचे बुड्डी चे बाल झाले पांढरे
गुलाबी रंगाचे बुड्डी चे बाल झाले पांढरे
राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर
भोर : लहान मुलांना आकर्षित करणारे गुलाबी रंगाचे ‘बुड्डीचे बाल’ आता काही ठिकाणी पांढऱ्या रंगात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.
आज किकवी येथील आठवडे बाजारात एक वयस्कर व्यक्ती पांढरे बुड्डी चे बाल विकताना निदर्शनास आला.
पण लहान मुलांच्या आवडीचा व आकर्षित गुलाबी रंग या बुड्डी च्या बाल ला नसल्याने कोणी त्याच्या पासून बुड्डी चे बाल विकत घेत नसल्याने तो व्यक्ती हताश होऊन बाजारात फिरत होता.
जत्रा, यात्रा, बाजारपेठा तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लहान मुलांच्या आवडीचा हा खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर विकला जातो. मात्र, बुड्डीच्या बालाच्या रंगात झालेला बदल आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगद्रव्यांबाबत नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
बुड्डीचे बाल तयार करण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. मशीनमध्ये साखर फिरवून त्याचे बारीक तंतू तयार केले जातात. त्याला आकर्षक रंग देण्यासाठी काही विक्रेते खाद्य रंगांचा वापर करतात. गुलाबी रंगामुळे हे बुड्डीचे बाल लहान मुलांना विशेष आकर्षित करते. मात्र, खाद्यपदार्थ तयार करताना वापरण्यात येणारा रंग अन्नासाठी मान्यताप्राप्त आहे का,
काही ठिकाणी गुलाबी रंगाऐवजी पांढऱ्या रंगाचे बुड्डीचे बाल विकले जात असल्याने नागरिकांकडून त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रंग बदलण्यामागे कोणते कारण आहे, यामध्ये कोणत्या प्रकारचा रंग वापरला जातो,
लहान मुलांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये चिंता वाढत आहे.
बुड्डीचे बाल हे मुख्यतः साखरेपासून तयार होत असल्याने त्याचे अतिसेवन मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. त्यात वापरल्या जाणाऱ्या रंगाची गुणवत्ता आणि स्वच्छता याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. धूळ, अस्वच्छ पाणी, हाताळणी तसेच उघड्यावर ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे पालकांनी मुलांना बुड्डीचे बाल देताना ते कुठे तयार केले जाते, कोणत्या परिस्थितीत विकले जाते आणि त्यामध्ये वापरलेले रंग व इतर साहित्य सुरक्षित आहे का, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गुलाबी असो किंवा पांढरे—बुड्डीचे बाल लहान मुलांना खाण्यासाठी देणे योग्य आहे का हे पालकांनी ठरवावे.





