राजगड सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
राजगड सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर / निगडे
भोर तालुक्यातील अनंत नगर निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ,
शेतकरी, संचालक मंडळ व कामगारांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या सभेत कारखान्याच्या मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच ऊस उत्पादक सभासदांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष व चेअरमन माजी आमदार संग्राम दादा थोपटें होते.
सभेच्या प्रारंभी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मागील आर्थिक वर्षातील कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक तसेच वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सभासदांसमोर मांडण्यात आला.
यावेळी कारखान्याच्या गाळप हंगामातील कामगिरी, ऊस उपलब्धता, साखर उत्पादन, उपपदार्थ निर्मिती, ऊस उत्पादकांना देण्यात येणारी बिले, कारखान्याची आर्थिक स्थिती आणि आगामी गाळप हंगामाच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली
राजगड सहकारी साखर कारखाना नव्याने उभारण्यासाठी मंजूर कर्जाची रक्कम मिळाली की पुन्हा पूर्ण ताकतीने राजगड कारखाना चालवू असे कारखान्याचे अध्यक्ष चेयरमन संग्राम दादा थोपटें यांनी सांगितले
उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





